कडकनाथ पाळून करा लक्षावधींची कमाई


अनेकांना नोकरी करण्यापेक्षा एखादा चांगला व्यवसाय करावा अशी इच्छा असते. अशा लोकांसाठी कडकनाथ उत्पनांचे चांगले साधन बनू शकतो. कडकनाथ ही कोंबड्यांची एक विशेष जात असून काळ्या रंगाचे मांस असणारी ही एकमेव जात आहे. या जातीच्या कोंबडीच्या एका अंड्याला ५० रूपयांपर्यंत किंमत मिळते तसेच चिकनला ब्रायलरच्या तुलनेत दुप्पट किंमत मिळते. या जातीच्या कोंबड्यांच्या मांसाला तसेच अंड्याना देशातून वाढती मागणी असल्याचेही आकडेवारी सांगते. तसेच अंडी ओनलाइनहि विकली जातात.

कडकनाथ ही काळ्या रंगाच्या कोंबड्यांची जात मुळची मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातली. असे सांगतात की या कोंबड्या त्यांची चव,स्वाद व आरोग्यपूर्ण मांस यासाठी प्रसिद्ध आहेत. पांढर्‍या चिकनच्या तुलनेत या कोंबड्यांच्या मासात कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी असते व अमिनो अॅसिड जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक हितकर ठरते. आजकाल या जातीच्या कोंबड्या देशभर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र, आंध्र, तमीळनाडू सारख्या अनेक राज्यात व्यावसायिक या कोंबडी पालनातून लक्षावधींची कमाई करत आहेत.

या कोंबड्यांचे मांस ६ महिन्याची कोंबडी असेल तर १५० ते २०० रूपये व १२ महिन्यांची असेल तर २५० ते ३०० रूपयांनी विकले जाते. देशी कोंबडीसाठी हाच दर ९० ते १५० रूपये आहे. या जातीच्या १०० कोंबड्या पाळण्यासाठी १५० चौरस फूट जागा लागते. पोल्ट्री मध्ये मोकळी हवा, पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो तसेच पाण्यापासून उंच जागेवर पोल्टी असणे फायद्याचे ठरते. या कोंबड्यांना अंधारात अथवा रात्री खाणे देऊ नये तसेच एका पोल्ट्रीत एकाच ब्रीडची पिले ठेवावीत. पाण्याची भांडी दिवसातून दोन तीन वेळा साफ करावीत असा सल्ला दिला जातो. पोल्टी सुरू करताना बाहेरून पिले मागवूनही सुरू करता येते.

Leave a Comment