वॉशिंग्टन – लवकरच एक छोटा पाहुणा सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला यांच्या घरी येणार आहे. खुद मार्कनेच फेसबूकवरून पोस्ट टाकत ही ‘ गुड न्यूज’ शेअर केली आहे. प्रिसिला आणि मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या घरी लवकरच आणखी एक छोटा पाहुणा येणार असल्याचे मार्कने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मार्क झुकेरबर्गने शेअर केली ‘गुड न्यूज’
डिसेंबर २०१५ मध्ये मार्क आणि प्रिसिला यांच्या पहिल्या मुलीचा, मॅक्सचा जन्म झाला होता. झुकेरबर्ग दांपत्याने मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर करतानाच फेसबूकचे ९९ टक्के शेअर्स दान करण्याचा निर्णयही जाहीर केला होता. तसेच झुकेरबर्ग दाम्पत्याने त्यांच्या मुलीसाठी लिहीलेले एक पत्रही फेसबूकवर शेअर केले होते. मॅक्स, आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या असंख्य चिमुरड्यांसाठी हे जग सुखकर आणि आनंददायी बनवण्याची आमची जबाबदारीआहे. तू आम्हाला जो आनंद, प्रेम दिलंस तेच तुला भरभरुन लाभो अशा शुभेच्छा.’ असे सांगत मार्कने फेसबुकवर आपला आनंद व्यक्त केला. तसेच या सर्व काळात आपल्याला भरभरून शुभेच्छा व पाठिंबा देणा-यांचेही मार्कने मनापासून आभार मानले होते.