आजच उरकून घ्या बँकेची महत्वाची कामे


नवी दिल्ली – बँकांमध्ये तुमची काही महत्वाची कामे असतील, तर ती आजच पूर्ण उरकून घ्या. नाहीतर पुढील ३ दिवस तुमची कामे रखडतील. याला कारण म्हणजे उद्यापासून सलग ३ दिवस राज्यभरात बँका बंद राहणार आहेत. तीन दिवसांच्या सुट्ट्यांनतर बँका थेट मंगळवारी १४ मार्च रोजी चालू होतील. त्यामुळे नागरिकांनी आजच्या दिवसात त्यांचे बँकाचे व्यवहार आटपून घेणेच हिताचे ठरेल. तीन दिवसाच्या सुट्ट्यांचा ताण बँकांच्या ‘एटीएम’वरही होणार आहे. त्यामुळे लोकांनी पैशांची गरज भासणार असल्यास आजच एटीएममधून पैसे काढावेत.

Leave a Comment