विमानांच्या मदतीने चीन अंतराळात उपग्रह सोडणार


चीनने विमानाच्या सहाय्याने अंतराळातच रॉकेटच्या सहाय्याने उपग्रह पाठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हवेतूनच प्रक्षेपित केली जाणारी ही रॉकेट निष्क्रिय झालेले उपग्रह वेगाने बदलू शकतील तसेच आपत्ती निवारणाच्या मदतीसाठी पृथ्वी वरून पाठविले जाणारे उपग्रह पाठवू शकतील. चायना अॅकॅडमी ऑफ लाँच व्हईकल टेक्नॉलॉजी संस्थेचे वाहक रॉकेट विकास प्रमुख ली तोंग यू यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले आम्ही १०० किलो वजनाचा पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचवू शकेल असे मॉडेल तयार केले आहे. आता २०० किलोवजनाचा पेलोड घेऊन जाऊ शकेल असे रॉकेट आम्ही तयार केले असून हे रॉकेट आमच्या हवाईदलात नुकत्याच सामील झालेल्या वाय २० विमानातून नेले जाईल. हे विमान एका ठराविक अंतरावर हे रॉकेट सोडेल, तेथेच ते प्रज्वलीत होईल व उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करेल.

याचे अनेक फायदे आहेत. जमिनीवरून उपग्रह सोडताना मोठा तळ उभारावा लागतो. रॉकेटमधील इंधन द्रवस्वरूपात असते व उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कांही आठवड्यांची तयारी करावी लागते. हवामान खराब असल्यास प्रक्षेपण थांबवावे लागते. विमानातून रॉकेट नेऊन अंतराळात सोडण्यासाठी जमिनीवर करावी लागणारी कोणतीही तयारी करावी लागत नाही शिवाय १२ तासांची तयारी पुरेशी असते. यात सॉलीड इंधनाचा वापर करता येत असल्याने रॉकेट अधिक वेगाने जाऊ शक ते. खराब हवामानाचा त्यावर परिणाम होत नाही व लॉचिंगसाठी येणारा खर्चही बराच कमी होतो.

जगातील पहिले वायू प्रक्षेपित अंतराळ मिशन अमेरिकेने १९९० सालीच राबविले आहे.

Leave a Comment