मुंबईतील दोन कुत्री ५ कोटींच्या मालमत्तेची वारसदार


गोल्डन रिट्रायव्हर या जातीची दोन कुत्री आपल्या नावाचा अर्थ खर्‍या अर्थाने सिद्ध करणारी ठरली आहेत. नंदिनी सुचडे व त्यांचे पती निमेश यानी पोटच्या अपत्याप्रमाणे वाढविलेल्या या कुत्र्यांच्या नावाने आपली सर्व मालमत्ता केली असून त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला जात आहे. बडी व रिनी नावाची ही कुत्री मुंबईतील सर्वात श्रीमंत कुत्री ठरणार आहेत.

ही कुत्री प्रथमपासूनच ऐषारामाचे जीवन जगत आहेत. नंदिनी या अर्थसल्लागार म्हणून नोकरी करत होत्या व मुबईत त्यांची गाठ १९९८ साली गुजराथी व्यावसायिक निमेश यांच्याशी पडली. प्रेमाचे रूपांतर विवाहबंधनात झाले. हे दोघे एकत्रच इंपोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसाय करतात व त्यातून त्यांनी चांगली मालमत्ता केली आहे. आपलेही अपत्य असावे असे या दोघांचे स्वप्न होते. त्यातच नंदिनी यांचा गर्भपात झाला व नंतर पुढच्या ट्रीटमेंट सुरू झाल्या. या परिस्थितीत निमेश यांनी २००३ साली बडी या कुत्र्याला घरी आणले. त्यावेळी नंदिनी यांना जाणवले की या मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे अधिक महत्त्वाचे आहे. मग स्वतःच्या अपत्याचा विचार त्यांनी सोडून दिला व आपले सर्वस्व बडी व त्यामागून आलेल्या रिनी साठी अर्पण केले.

नंदिनी सांगतात आम्ही त्यांना पेट म्हणत नाही तर ती आमचे बच्चे आहेत. चांदीच्या ताटातून त्यांना आम्ही भरवितो त्यांचे उरलेले अन्यही खातो. आपल्या अपत्याला देऊ तसेच प्रेम आम्ही त्यांना देतो. नंदिनी हार्टपेशंट आहेत त्यामुळे त्यांच्याबरेाबरच त्यांच्या या दोन बच्च्यांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी त्यांनी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. खारघर येथील दोन घरे, कुलाब्यातील घर, मस्जीद बंदरची जागा, कोलकात्याचे अपार्टमेंट व ५ कोटींची मालमत्ता त्यांनी या दोन कुत्र्यांच्या नांवे केली आहे.

वास्तविक त्यांच्या कडे आणखीही एक कुत्रा होता. तो मरण पावला. मात्र ट्रस्ट या तिघांच्या नांवे केला गेला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अन्य अनाथ, आजारी कुत्र्यांनाही मदत दिली जाणार आहे. बनी व रिनी च्या गळ्यात नंदिनी यांनी ओम व गणेशाच्या प्रतिमा असलेली सोन्याची लॉकेटस घातली आहेत. हे पतीपत्त्नी कोणत्याही प्रवासाला जाताना त्यांना बरोबर नेतात. अगदी तिरूपती, सारख्या ठिकाणीही त्यांचे व्हीव्हीआयपी पास काढून त्यांना नेले जाते तसेच पंचतारांकित हॉटेलमध्येही त्यांना विशेष परवानगी काढून पार्टीसाठी नेले जाते.

Leave a Comment