जनधनचे ओझे पेलण्यासाठी पेनल्टी गरजेची- अरूंधती भट्टाचार्य


स्टेट बँकेने ग्राहकाच्या खात्यात किमान शिल्लक नसेल तर पेनल्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे असे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी सांगितले. महिला दिनानिमित्त महिला उद्योजक संघटनेच्या संमेलनात त्या बोलत होत्या.

भट्टाचार्य म्हणाल्या बँकांवर झिरो बॅलन्स खाती म्हणजे जनधन खात्यांचा मोठा बोजा आहे.ही खाती मॅनेज करण्यासाठी अशा पेनल्टीची आवश्यकता आहे. पेनल्टी आकारण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबद्दल अजून सरकारकडून कोणतेही पत्र आलेले नाही असे सांगून त्या म्हणाल्या, तसे पत्र मिळाले तर विचार केला जाईल. सध्या बँकेला ११ कटींहून अधिक जनधन खाती मॅनेज करावी लागत आहेत त्यासाठी कांही चार्जेस हवेत.

बँकेच्या पेनल्टी आकारणी संदर्भात असे नियम केले गेले आहेत. महानगरातील बँक शाखेत खाती असलेल्यांसाठी किनान रक्कम ५ हजार रूपये, शहरी भागासाठी ३ हजार, निमशहरी भागासाठी २ हजार तर ग्रामीण भागासाठी ही रक्कम १ हजार रूपये आहे. १ एप्रिलपासून पेनल्टी आकारली जाणार आहे. महानगरांसाठी ७५ टक्कयांपेक्षा कमी रक्कम असेल तर १०० रूपये अधिक सेवाकर, ५० ते ७५ टक्के बॅलन्ससाठी ७५ रूपये, त्यापेक्षा खाली असल्यास ५० रूपये अशी पेनल्टी असेल. अन्य भागात हेच दर २० ते ५० रूपयांच्या दरम्यान असणार आहेत.

Leave a Comment