मोअरची इलेक्ट्रिक बाइक धावणार ताशी २० किमी वेगाने


नवी दिल्ली : ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये इंधनावर फोकस करत जगभरातील कंपन्या इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याचा प्रयत्न करत असून मोअर या कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ताशी २० किमी वेगाने ही बाइक धावू शकणार आहे.

या इलेक्ट्रिक बाइकला २४ इंचाचे टायर देण्यात आले असून या टायर्सना स्पोर्टी लूक देण्यात आले आहेत. या बाइकमध्ये एलईडी हेडलाईटस्, ब्रेक लाइटस्सह हायड्रॉलिक असिस्टिड डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून पहिल्यांदाच फोल्डिंग मॅकेनिझमचा वापर या इलेक्ट्रिक बाइकमध्ये करण्यात आला आहे. तसेच या बाइकला एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेण्यासाठी फोल्डिंगचे फिचर्स देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक बाईकची किमत ६६ हजार ६२३ रुपये ऐवढी आहे.

Leave a Comment