दहा रुपयांच्या नोटेचे बदलणार रुपडे


मुंबई : लवकरच चलनात दहा रुपयांची नवीन नोट दाखल होणार असून या संदर्भातील घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. नव्या नोटा सुरक्षेच्या अतिरिक्त बाबींसह चलनात दाखल होतील.

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तत्कालीन नोटा गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांची नोट आरबीआयने व्यवहारात आणली. त्यानंतर सुरक्षेच्या अतिरिक्त फीचर्ससह शंभर, पन्नास रुपयांच्या नवीन नोटाही चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली होती. महात्मा गांधी सीरिज २००५ मधील या नोटांवर दोन्ही नंबर पॅनेलमध्ये ‘एल’ (L) हे अक्षर चौकटीत असेल. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल. नोटेच्या मागच्या बाजुला छपाईचे वर्ष (२०१७) असेल. डावीकडून उजवीकडे दोन्ही पॅनलवरील नंबराचा आकार वाढत जाईल. पहिल्या तीन अल्फा न्युमरिक कॅरेक्टर्सचा आकार मात्र कायम राहील. सध्या चलनात असलेल्या दहाच्या नोटा कायम राहणार आहेत.

Leave a Comment