टाटा मोटर्सची नवी स्पोर्ट्स कार ‘रेसमो’ सादर


जीनिव्हा – स्पोर्ट्स कार प्रकारात उडी घेत टाटा मोटर्सने कंपनीची पहिलीच गाडी सादर केली असून कंपनीने रेसमो ही कार स्वित्झर्लंडची राजधानी जीनिव्हामध्ये आयोजित ८७व्या जीनिव्हा मोटार शो २०१७मध्ये दाखल केली. यावेळी कंपनीने टॅमो या नावाने आपला नवीन सब ब्रॅन्ड सुरू केल्याचे घोषणा केली. २०१८मध्ये ही नवीन कार बाजारपेठेत दाखल होईल असा अंदाज आहे. कंपनी पहिल्यांदा या कारच्या केवळ २५० युनिट्स तयार करणार आहे. बाजारात या गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी कंपनीला अपेक्षा आहे.

रेसमो ही कार एक सब-४ मीटर प्रकारातील २ सीट असणारी स्पोर्ट्स कार आहे. या कारच्या मागील बाजूस इंजिन आहे. हे इंजिन १.२ लीटर क्षमतेचे असून त्यामध्ये रेवोट्रॉन टर्बोचार्ज पेट्रोल प्रकारातील आहे. ०-१०० किलोमीटरचा वेग प्राप्त करण्यासाठी कारला केवळ ६ सेकंद लागतात. या कारमध्ये ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

अपघातावेळी कोणत्याही प्रकारची इजा आतील लोकांना होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. रेसमो आणि रेसमो प्लस या दोन श्रेणीत ही गाडी बाजारात उतरविण्यात येईल. या कारची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र ती २५ लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणा-या अन्य स्पोर्ट्स कारच्या तुलनेत ही किंमत कमी आहे.

Leave a Comment