रोल्स रॉईसची खास हॉस्पिटल वापरासाठी छोटी कार


लग्झरी कार मेकर रोल्स रॉईसचे प्रथमच खास हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी वापरता येणारी छोटी कार तयार केली असून रोल्स राईस एसआरएच असे तिचे नांव आहे. ही कार लहान मुलांना शस्त्रक्रियेसाठी नेत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाईल. रिचर्ड हॉस्पिटल सर्जरी युनिटसाठी ती तयार केली गेली असून या हॉस्पिटलवरूनच तिचे नामकरण केले गेले आहे.

या कारच्या चाकांवर आर आर असा लोगो आहे. २४ व्होल्टच्या बॅटरीवर ताशी १० किमीच्या वेगाने ती चालते. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ऑटो इतिहासातली ही सर्वात छोटी कार आहे. कंपनीचे सीईओ टॉर्स्टन मुलर ओटवॉस म्हणाले की कार मुलांना शस्त्रक्रिया होण्याअगोदर जो ताण येतो तो दूर करण्यास मदत करेल असा विश्वास आहे.