देशातली अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मंगळवारपासून त्यांच्या कर्मचार्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू केली आहे. बँक बोर्डाने कांही दिवसांपूर्वीच या योजनेला मंजुरी दिली होती मात्र ही सुविधा लागू करण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार मोबाईल डिव्हाईसच्या मदतीने बँकेचे कर्मचारी गरजेनुसार घरूनही काम करू शकणार आहेत. या सुविधेमुळे कर्मचार्यांना घाईघाईने व धावतपळत ऑफिस गाठण्याची गरज राहणार नाही व त्यांची प्रॉडक्टिव्हीटी अनेक पटींनी वाढेल असा विश्वास बँक व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
एसबीआयची वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू
या सुविधेनुमार मोबाईलवर डेटा व ऑफिस मॅनेजमेंट तसेच सुरक्षिततेसाठी कंम्प्युटिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. अतिशय काळजीपूर्वक डिझाईन केलेल्या एमआयएस व डॅशबोर्डच्या मदतीने टेक्नॉलॉजी व सर्व्हिसेस वापरावर नजर ठेवली जाणार आहे. याच्यापुढे जाऊन क्रॉस रोल मार्केटिग, सीआरएम, सोशल मिडीया मॅनेजमेंट, सेटलमेंट, रिकन्सीलेशन, तक्रार व्यवस्थापन अॅपही वर्क फ्रॉम होम च्या सुविधेअंतर्गत अधिक चांगल्या पद्धतीने वापरता येणार असल्याचे समजते.