मुंबई: आधार क्रमांकावर आधारीत ‘आधार पे’ हे अप्लिकेशन आयडीएफसी बँकेने विकसित केले आहे. हे ऍप ग्राहकांनी नव्हे; तर दुकानदारांनी वापरायचे आहे. ग्राहक केवळ आधार क्रमांक आणि बँकेचे नाव सांगून व्यवहार पूर्ण करू शकतात. या ऍपचा वापर करून केल्या जाणाऱ्या व्यवहारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
आता आधार क्रमांकाने करा आर्थिक व्यवहार
ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी हे ऍप उपयुक्त ठरेल. या व्यवहारांसाठी कोणतेंही शुल्क आकारले जाणार नसल्याने या ऍप ला मोठा प्रतिसाद लाभेल; असा विश्वास नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केला. मार्ट फोन आणि क्रेडीट, डेबिट कार्ड नसतानाही या ऍपच्या आधाराने व्यवहार करता येणार आहेत.
दुकानदारांनी आपल्या स्मार्ट फोनवर हे ऍप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. या फोनमध्ये बायोमेट्रिक स्कॅनर असणेही आवश्यक आहे. आधार क्रमांक आणि बोटांचे ठसे या द्वारे व्यवहार पूर्ण होऊ शकणार आहे. या ऍपचा वापर करून केले जाणारे व्यवहार सर्वात सुरक्षित असतील; अशी ग्वाही ‘यूआयएडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पांडे यांनी दिली.