चीनी कंपनी शाओमीने लवकरच नवा व अनोखा हॅडसेट बाजारात आणण्यात येत असल्याची घोषणा केली असून मी मिक्स टू या नावाने तो बाजारात येईल. या फोनचे फिचर्स लिक झाले आहेत. त्यानुसार या फोनच्या डिस्प्लेच्या मधोमध फिंगरप्रिंट सेन्सर दिला जात आहे. या प्रकारचा हा पहिलाच फोन असल्याचेही सांगितले जात आहे.
शाओमीचा डिस्प्लेच्या मधोमध फिंगरप्रिंट सेन्सरवाला फोन
डिस्प्ले च्या मधोमध फिंगरप्रिट देणार्या टेक्नॉलॉजीवर काम करणारी कंपनी गुडिक्स यांनी इनडिस्प्ले तंत्रज्ञानाचा खुलासा मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१७ मध्ये केला होता. त्यानुसार हे तंत्रज्ञान आयफोन आठसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे तसेच सॅमसंग गॅलेक्सी एस ८ मध्येही होम बटण दिले जाणार नाही तर त्याऐवजी हे तंत्रज्ञान दिले जाईल असेही सांगितले जात आहे. तरीही मी मिक्स टू हा या तंत्रज्ञानावरचा पहिलाच स्मार्टफोन ठरणार आहे. या फोनला आयरिस सेन्सर दिला जाणार नाही. हा फोन सप्टेंबरमध्ये लाँच केला जाणार असून या फोनची पूर्ण बॉडी सिरॅमिकची आहे. अत्यंत आकर्षक डिझाईनमध्ये हा फोन बाजारात येईल असेही समजते.