रिलायन्सने ‘पेटीएम’मधील हिस्सेदारी ‘अलिबाबा’ला विकली


मुंबई: मोबाईल वॉलेट कंपनी ‘पेटीएम’मधील एक टक्का हिस्सेदारी रिलायन्स कॅपिटलने अलिबाबा समुहाला विकली असून लोकप्रिय डिजिटल कंपनी असलेल्या ‘पेटीएम’मधील एक टक्का हिस्सेदारीची सुमारे २७५ कोटींना विक्री करण्यात आली आहे.

‘पेटीएम’मध्ये ही हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने १० कोटींची गुंतवणूक केली होती. या व्यवहातून रिलायन्स कॅपिटलला तब्बल २६०० टक्के नफा झाला आहे. ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा मोदी सरकारने चलनातून बंद केल्यानंतर बाजारात चलनाची टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर पेटीएमच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचाला नोटाबंदीचा मोठा फायदा झाला आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचावरुन तब्बल ५००० कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले होते. तसेच ग्राहकांनी गेल्या महिन्यात एकुण २० कोटी व्यवहार केले होते. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सरलेल्या वर्षात पेटीएम पेमेंट्स बँकेची स्थापना करण्यासाठी पेटीएममधील काही हिस्सेदारी विकली होती.

Leave a Comment