गोल्ड प्लेटेड सुप्रिमो पुतीन नोकिया ३३१०


नोकियाने त्यांचा आयकॉन मॉडेल ३३१० नुकताच सादर केला आहे. या फोनसाठी साधी सिंपल फिचर्स दिली गेली असली तरी कंपनीने या फोनचे लग्झरी मॉडेलही बाजारात नुकतेच सादर केले आहे. या फोनच्या नावापासूनच सारे काही खास आहे. या मॉडेलचे नामकरण रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्यापासून प्रेरणा घेऊन केले गेले आहे. सुप्रीमो पुतीन या नावाने आलेला हा फोन गोल्ड प्लेटेड असून फोनच्या बॅक साईडला पुतीन यांचे गोल्ड प्लेटेड पोट्रेट आहे. याच्या चारीबाजूंनी गोल्ड प्लेटेड गोल्ड सील आहे व त्यात रशियाचे राष्ट्रगीत आहे.

फोनचे फ्रंट बटणही गोल्ड प्लेटेड आहे व त्याच्यावर रशियन कोट ऑफ आर्म्सची प्रतिमा आहे. या फोनसाठी अतिशय सुबक अशी लाकडी केस दिली गेली असून त्याला ब्लॅक वेलवेट कव्हर आहे. या फोनची किंमत ९९००० रशियन रूबल्स म्हणजे १,१२,७८५ रूपये आहे. बाकी देशात या फोनला ग्राहक मिळालेले नसले तरी रशियात पुतीन फॅन्सची संख्या मोठी असल्याने तेथे हा फोन विक्रमी संख्येने विकला जाईल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment