‘वनप्लस’ या मोबाइल कंपनीच्या सदिच्छा दूतपदी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली असून सध्या मोबाइल जगतामध्ये ‘वनप्लस’ कंपनीच्या हॅण्डसेट्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यातही आता ‘वन प्लस’ला बिग बींच्या लोकप्रियतेचा फायदाही फायदेशीर ठरणार यात शंका नाही.
अमिताभ बच्चन ‘वनप्लस’चे सदिच्छा दूत
वनप्लस ब्रॅण्डची वाढती लोकप्रियता पाहता आता हा व्यवसाय वरच्या पातळीवर नेण्यासाठी आम्ही आता एका नव्या मार्गाने ग्राहकांसोबत एक अर्थपूर्ण नाते बनवू पाहात आहोत, असे वक्तव्य ‘वन प्लस’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष पेते लौ यांनी केले. अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्डचा नवा चेहरा बनवत आम्ही ग्राहकांसोबत असलेले नाते आणखी दृढ करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत असेही पेते म्हणाले.