फ्लिपकार्टमध्ये होणार बंपर भर्ती


नवी दिल्ली – ई-रिटेल कंपनी फ्लिपकार्टने अ‍ॅमेझॉनशी स्पर्धा करण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. एकीकडे स्नॅपडीलने आपले कर्मचारी कमी करण्यास सुरूवात केली असताना, दुसरीकडे फ्लिपकार्टने यावर्षी 20 ते 30 टक्के अधिक कर्मचार्‍यांच भर्ती करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, जास्तीत जास्त कर्मचार्‍यांना नोकरी उपलब्ध करून दिल्याने कंपनीची प्रगती होणार असून नफ्यात वाढ होणार आहे.

कंपनीचे सीओओ नीतिन सेठ म्हणाले, 2017 मध्ये कंपनीकडून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून बंपर भर्ती करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीतील सर्व विभागात नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मागील वर्षी कंपनीत 1500 लोकांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले होते. याशिवाय लॉजिस्टिकमध्ये 10 हजार लोकांना रोजगार मिळवून दिला होता. त्यामुळे विविध सण, उत्सवात कंपनीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

दरम्यान, बाजारात वाढत्या स्पर्धेमुळे स्नॅपडिलवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीने खर्च कमी करण्यासाठी पुढील 2 महिन्यात 30 टक्के कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुडगाव स्थित कंपनीच्या मुख्यालयात काम करणार्‍या ऑपेरशन विभागातील कर्मचार्‍यांसह करार पद्धतीने भर्ती करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना काढण्यात येणार आहे.

Leave a Comment