गर्व्हनर पटेल यांना धमकी देणार्‍याला पोलिस कोठडी


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना धमकीचे ईमेल पाठविणार्‍या तरूणास मुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी नागपूरातून अटक केली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २३ फेब्रुवारी रोजी पटेल यांना एक धमकीचे ईमेल मिळाले होते. त्यात नोकरी सोडा अन्यथा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अपाय होऊ शकतो अशी धमकी दिली गेली होती. हे ईमल पटेल यांनी आरबीआयच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना दिले तेव्हा त्यांनी मुंबई सायबर शाखेमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी केलेल्या तपासात हे ईमेल नागपूरच्या एका कॅफेतून पाठविण्यात आल्याचे उघड झाले.त्यावरून तपास करून पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून त्याला न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. वैभव बडलवार असे या तरूणाचे नांव असून तो परदेशात शिकलेला आहे मात्र सध्या बेरोजगार आहे असे दिसून आले आहे.

Leave a Comment