महिला दिननिमित्ताने टाटा स्कायची सवलत योजना


पुणे – ४ ते १० मार्च या कालावधीत टाटा स्कायकडून महिला दिन आठवडा साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने विविध सवलती देण्यात येत आहेत. या अंतर्गत टाटा स्काय कुकिंग, टाटा स्काय फिटनेस, टाटा स्काय म्युझिक, डान्स स्टुडिओ आणि मिनिफ्लेक्स यांचे पहिल्या महिन्यासाठी एक रुपया शुल्कात वितरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. मिनिफ्लेक्सकडून क्वीन, बेफिकरे, चाल्क अँड डस्टर, ब्लॅक या अनेक सारखे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. डान्स स्टुडिओमध्ये नृत्यदिग्दर्शन आणि बॉलिवूड डान्स स्टाईल, तसेच टाटा स्काय कुकिंगमध्ये विविध पद्धतीचे जेवण आणि सेलिब्रिटी शेफ दाखविणार आहेत.

Leave a Comment