मर्सिडीजचा सर्वात मोठा रिकॉल


नवी दिल्ली – जगभरातील १० लाख कार जर्मनीची कार निर्मिती कंपनी मर्सिडीजने परत मागवल्या असून हा निर्णय कारमध्ये आग आणि ओव्हरहीट यामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन घेतला असल्याचे बोलले जाते. उल्लेखनीय म्हणजे अमेरिकेत सुमारे ७५ हजार कारमध्ये ओव्हरहीटिंगची समस्या असल्याचे समोर आले होते.

मर्सिडीजने परत मागवलेल्या कारमध्ये सी क्लास, इ क्लास आणि सीएलए कार शिवाय जीएल आणि जीएलसी एययूव्हीचाही समावेश आहे. २०१५ ते २०१७ या काळातील या सर्व कार आहेत. अमेरिकेतूनच तब्बल ३ लाख ८ हजार कार परत येणार आहेत.

सुमारे ५१ तक्रारी जगभरातून मर्सिडीजला कारला आग लागण्याच्या आल्या होत्या. यातील ३० प्रकरणे ही एकट्या अमेरिकेतील आहेत. परंतु, कंपनीला या दुर्घटनेत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त कंपनीकडे आलेले नाही. मर्सिडीजने रविवारी अमेरिकन सरकारला सोपवलेल्या कागदपत्रांमध्ये ओव्हरहिटिंगचे कारण सांगितले आहे. वारंवार कार सुरू केल्यामुळे ओव्हरहीटिंगची समस्या येते. यामुळे कारचे साहित्य वितळण्याची शक्यता असते. कंपनी या सर्व कारची दुरूस्ती करणार असून याचे शूल्क घेणार नाही.

Leave a Comment