भारतीय बाजारपेठेत ग्राहकांचे स्वस्त, सुंदर, टिकाऊ वस्तूंना जास्त प्राधान्य असते हेच ओळखून ‘शाओमी’ कंपनीने आपले नवे स्मार्ट फोन भारतीय बाजारपेठेत लाँच केले असून शाओमीचा ‘रेडमी नोट फोर’ गेल्या दोन आठवड्यापासून दोन ऑनलाइन पोर्टलवर विक्रिसाठी उपलब्ध झाला आहे. आता पुढच्या महिन्यात आणखी एक स्मार्ट फोन घेऊन शाओमी येणार असल्याची चर्चा आहे. या एप्रिलपर्यंत शाओमीचा Mi ६ हा बाजारात येणार आहे.
एप्रिलमध्ये बाजारपेठेत दाखल होणार शाओमीचा ‘Mi-६’
हा फोन १६ एप्रिलला लाँच होणार असल्याचे वृत्त आहे. या फोनमध्ये ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले २.५ डी कर्व्ह ग्लास बसवण्यात आला आहे. १९ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि स्लो मोशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचे फिचर्स यात असणार आहे. शाओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ८३५ ऑक्टा कोर प्रोसेसर बसवला असून ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी अशा तीन प्रकरात हा फोन उपलब्ध असणार आहे. या फोनची किंमत २० ते २५ हजारांच्या आसपास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.