देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्याच्या बाबतीत तमिळनाडूने सलग सहाव्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे, तर महाराष्ट्र तब्बल सहाव्या स्थानी आहे. तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यातही तमिळनाडू सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानी असण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यात तमिळनाडू पुन्हा अव्वल
वर्ष 2016 मध्ये भारतात एकूण 165.3 कोटी देशांतर्गत पर्यटकांनी प्रवास केला. यातील 34.43 कोटी एकट्या तमिळनाडूत गेले. त्यापूर्वीच्या वर्षी हीच संख्या 33.34 कोटी एवढी होती.
तमिळनाडूच्या मागोमाग उत्तर प्रदेशने आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. तर मध्य प्रदेशने मोठी आघाडी घेत तिसरे स्थान पटकावले आहे. चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र आहेत. महाराष्ट्रात आलेल्या पर्यटकांची संख्या केवळ 11.54 कोटी होती.
विशेष म्हणजे पश्चिम बंगालने तेलंगणाला मागे टाकत सातवे स्थन पटकावले. त्यानंतर गुजरात आणि राजस्थानचा क्रमांक येतो.