जगातली सर्वाधिक महागडी गाय- किंमत २२ कोटी


भारतातला युवराज नावाचा रेडा यापूर्वीच त्यांच्यावर लागलेल्या ७ कोटी रूपयांच्या किंमतीमुळे जगभरात प्रसिद्ध झाला असतानाच किमतीच्या बाबतीत युवराजला मागे सारणारी एक गाय प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. जगातील सर्वात महागडी गाय अशी प्रसिद्धी तिला मिळाली असून लिलावात या गाईला ३.२३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २२ कोटी रूपयांची बोली मिळाली आहे.

ईस्टसाईड लेविसडेल गोल्ड मिस्सी नावाची ही गाय हॉल्स्टन जातीची आहे. या जातीच्या गाई उत्तर अमेरिकेत आढळतात. या जातीच्या बहुतेक गाई त्यांच्या दुग्धकाळात ९७०० शे लिटर दूध देतात. गोल्ड मिस्सीला लिलावात व्यापार्‍यांनी चढाओढीने बोली लावली व अखेर २२ कोटी रूपयांच्या बोलीवर हा लिलाव संपला. या जातीच्या गाईंमुळेच अमेरिका व कॅनडात दुग्धउत्पादनात प्रचंड वाढ झाली असून येथील दुग्ध व्यवसायातही तेजीने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment