होंडा बंद करणार मोबिलियोचे प्रॉडक्शन


नवी दिल्ली : आपल्या मोबिलियो कारचे प्रॉडक्शन जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने बंद केले आहे. कंपनीने या कारचे प्रॉडक्शन ग्राहकांच्या मागणीत घट आणि विक्रीमध्ये कमी या कारणांमुळे बंद केले आहे. मोबिलियो ही कार २०१४मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली.

होंडा मोबिलियोच्या फक्त ६३ युनिटची जानेवारी महिन्यात विक्री करण्यात आली. मात्र, फेबुवारीमध्ये या कारची डिमांड ब-याच प्रमाणात कमी झाली. त्यामुळे कंपनीने या कारचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होंडाने भारतामध्ये क्रॉस वाहनांची मागणी पाहता १६ मार्चला डब्लू. आर. व्ही. ही कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरते का, हेच पाहणे गरजेचे आहे.

Leave a Comment