सॅमसंगचा गॅलेक्सी एस ८ मार्चच्या २९ ला लाँच होणार


सॅमसंगचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन गॅलेक्सी एस एट २९ मार्चला लाँच होत असल्याची घोषणा स्पेनमधील बार्सिलोना येथे होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये केली गेली आहे. गॅलेक्सी अनपॅक्ड २०१७ इव्हेंटचे आयेाजन २९ मार्चला न्यूयॉर्कमध्ये केले गेले असून तेथे हा फोन सादर केला जाणार आहे. या फोनची विक्री २१ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या इव्हेंटमध्ये गॅलेक्सी एस एट व एस एट प्लस अशी दोन व्हेरिएंट सादर केली जातील. गॅलेक्सी एस सेव्हनपेक्षा या फोनचे डिझाईन पूर्णपणे वेगळे असल्याचेही सांगितले जात आहे. फोनला लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर दिला गेला असून ४ व ६ जीबी रॅम मध्ये तो येणार आहे. एस एट साठी ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असून ते कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविता येईल. त्याला ३२५० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.

एस एट प्लससाठी ६.२० इंची स्क्रीन दिला गेला आहे. ४ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी, ३००० एमएएच बॅटरी, अँड्राईड नगेट ७.० ओएस, १६ एमपीचा रियर कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment