रतन टाटांची आवडती लँडरोव्हरची वेलर येणार


जग्वार लँडरोव्हरची मालकी असलेल्या टाटा मोटर्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना अतिशय आवडलेली लँडरोव्हर वेलर ही एसयूव्ही लाँच केली जात असून भारतासह जगभरातील देशांसाठी तिचे बुकींग सुरू झाले आहे. हे नवे मॉडेल ७ मार्चला जिनेव्हा ऑटो शो मध्ये सादर केले जात असून त्यावेळीच या गाडीची किंमत जाहीर केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या एसयूव्हीच्या किमती ४५ ते ८५ लाख या दरम्यान असतील. या वर्षाच्या मध्यापासून तिची डिलिव्हरी सुरू होईल असेही समजते.

ब्रिटीश कार मेकर लँडरोव्हरचा मुख्य डिझाईन अधिकारी गॅरी मॅक्गवर्न याने ही एसयूव्ही तयार झाल्याबद्दल रतन टाटा यांनी धन्यवाद दिले आहेत. तो म्हणाला, जेव्हा मी वेलरचे पहिले स्केच तयार केले तेव्हाच रतन टाटा यांना ते एकदम पसंत पडले व ते पूर्ण करा असा तगादाच त्यांनी लावला होता. वर्षातली ही सर्वात सुंदर एयसूव्ही असल्याचेही सांगितले जात आहे.

लँडरोव्हरने भारतात आत्ताच पाच एसयूव्ही लाँच केल्या आहेत. वेलर या शब्दाचा अर्थ कव्हर किवा आवरण असा होतो. या एसयूव्हीसाठी अल्ट्रा मॉडर्न अॅल्युनिमिनयम बॉडी, दिली गेली असून ती डिझेल व पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्यें येईल असे समजते. ही एसयूव्ही पाच सीटर असून तिचा ग्राऊंड क्लिअरन्सही उत्तम आहे. यामुळे ती ऑफ रोडसाठीही अतिशय उपयुक्त ठरेल असे समजते.

Leave a Comment