ऑनलाईन औषधविक्रीस मिळणार कायदेशीर मंजुरी


नवी दिल्ली – ई-फार्मसीचे नियमन करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली असून ई-फार्मसीचे नियम आगामी ६ महिन्यात तयार केले जातील आणि याला कायदेशीर मंजुरी देखील मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रानुसार ई-फार्मसीच्या नियमनासाठी एक केंद्रीय संस्था तयार केली जाणार असून याद्वारे कोणताही गैरवापर रोखला जाणार आहे.

ई-फार्मसीच्या वर्तमान रचनेत बदल केले जाणार असून काही औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते. अनेक ई-कॉमर्स कंपन्या सध्या जाहिरातींद्वारे औषधांची विक्री करत आहेत. परंतु याला कायदेशीर परवानगी नाही. ई-फार्मसीद्वारे औषधांच्या गैरवापराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्यानंतर सरकारने याचे नियमन करण्याची योजना बनविली होती. सरकारद्वारे बनविण्यात आलेल्या दिशानिर्देशांच्या कक्षेत ऑनलाईन औषध विक्री करणा-या सर्व कंपन्या येतील.

Leave a Comment