इलिओ मोटर्सची तीन चाकी कार


जगभर इंधन एफिशिएन्ट कार्स बनविण्याची स्पर्धा तेजीत असताना यूएस ऑटो कंपनी इलिओ मोटर्सने कमी बजेटमध्ये चांगले मायलेज देणारी तीन चाकी कार बाजारात आणली आहे. तीन चाके, सिंगल डोअर, टू सीटर अशी ही कार खरेतर मोटरसायकल कॅटेगरीतील आहे. निर्माते इलिओ तिला ऑटोसायकल असेच म्हणत आहेत.

ही कार ५ लाख रूपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळेल व १ लिटरमध्ये ती ३५ किमीचे मायलेज देईल. इलिओ मोटर्स ही अॅरिझोनामधील कंपनी असून या कारचे उत्पादन लुसियाना येथील प्रकल्पात केले जात आहे. ही कार पूर्णपणे मेड इन यूएस असून तिचे कॉन्सेप्ट फोटो प्रसिद्ध झाले आहेत. तिचे डिझाईन एकदमच वेगळे असून कंपनीने या कारच्या ६० हजार प्री ऑर्डर्स मिळाल्याचा दावा केला आहे. या कारला तीन एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, स्टॅबिलीटी कंट्रोल, स्टिरिओ, क्रूझ कंट्रोल अशा सुविधा असून ती वातानुकुलित आहे.

Leave a Comment