शिल्पाला गुगलच्या कॅफेटेरियात मिळाले ‘सरप्राईज’


सध्या कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे शिल्पा शेट्टी असून तिने यावेळी गुगल आणि फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. शिल्पाला गुगल कॅफेटेरियाकडून एक सरप्राईज मिळाले. तिच्या हिट गाण्यांचा स्पेशल मेनू शिल्पासाठी त्यांनी बनवला होता.

भारतीय पद्धतीचे जेवण शिल्पाला आवडत असल्याने त्याची देखील खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे जेवणात तूप आणि नारळाचा वापर करण्यात आला होता. शिल्पाने संपूर्ण गुगल मुख्यालयाला भेट दिली. गुगलचे मुख्यालय म्हणजे शिल्पाला एका शहरात आणखी एक शहर असल्यासारखे वाटले. तेथील कर्मचाऱ्यांना ज्याप्रकारे सुविधा दिल्या जातात ते पाहून शिल्पा भारावली. तेथील कर्मचाऱ्यांसाठी शिल्पाने योगा क्लास घेतला. यात तिने त्यांना प्राणायाम करण्यास शिकविले. तिच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष मेनूबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, गुगलच्या कॅफेटेरियात​ माझ्या गाण्यांवर बनवलेला विशेष मेनू खूपच छान होता. ​तसेच तेथे माझे मनःपुर्वक स्वागत करण्यात आले.

Leave a Comment