मास्टरब्लास्टरची लीन्किंडवर एन्ट्री


मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल नेटवर्कींग साईट लीन्किंडवर एन्ट्री घेतल्याची माहिती सचिनने ट्विट करून दिली आहे. त्याने लिहिले की, लीन्किंड इंडियावर येऊन मी फार आनंदी आहे. आता या सुंदर प्लॅटफॉर्मला समजून घेत आहे. या निमित्ताने सचिनने ‘माय सेकंड इनिंग’ टायटल असलेला एक ब्लॉगही लिहिला आहे. त्यात त्याने सांगितले की, त्याला कधी वाटले की त्याने क्रिकेट सोडावे.

ब्लॉगमध्ये सचिनने लिहिले आहे की, दिल्लीमध्ये ऑक्टोबर २०१३साली चॅम्पियन्स लीग गेम्स सुरू होते. माझी सकाळ जिम वर्कआऊटने सुरू झाली होती. मी गेल्या २४ वर्षांपासून हे रूटीन फॉलो करत आलो होतो, पण ती सकाळ काही वेगळी बदलेली वाटली. मला असे जाणवले की, मला उठायला आणि दिवसाची सुरूवात करायला जोर लावावा लागत आहे. तेव्हा मला कळले की, जिम ट्रेनिंग माझ्या क्रिकेटसाठी किती महत्वाचे आहे, तेव्हापासून ते माझ्या जीवनात होते. पण त्या सकाळी काही करण्याची माझी इच्छा होत नव्हती का? खरंतर ते संकेत होते की, मला आता थांबायला हवे. ते या गोष्टीचेही संकेत होते की, जो खेळ मला सर्वात प्रिय होता, माझ्या रूटीनचा भाग होता आता नाही.

सचिनने ब्लॉगमध्ये लिहिले की, सुनील गावस्कर माझे हिरोंपैकी एक आहेत. एकदा त्यांनी सांगितले होते की, त्यांची नजर जेव्हा नेहमीच घड्याळावर हे बघण्यासाठी पडत होती की, लंच आणि टी इंटरव्हलसाठी किती वेळ मिळतो, तेव्हाच त्यांनी गेम सोडण्याचा विचार केला होता. तेव्हा अचानक् माझ्या लक्षात आले की, त्यांच्या त्या बोलण्याचा अर्थ काय होता? माझे डोके आणि माझी बॉडी नेमकी तीच गोष्ट सांगत होती. शूज ठेवण्याची माझी वेळ आता आली होती.

Leave a Comment