प्राप्तिकर विभागाने लावला २५० कोटींच्या अघोषित संपत्तीचा शोध


नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाला नोटाबंदीदरम्यान बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमेतून २५० कोटींच्या अघोषित संपत्तीचा शोध लागला असून प्राप्तिकर विभागाच्या अनेक टीम ऑपरेशन क्लीनमनी अंतर्गत देशभरातील २३० हून अधिक ठिकाणी सर्व्हे केला. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली येथील व्यक्ती आणि कंपन्यांचा सर्व्हे करण्यात आला.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत या मोहिमेतंर्गत मिळालेले २५० कोटी रूपये हे जाहीर केले जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. ३१ मार्चपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू राहील. नोटाबंदीदरम्यान प्राप्त झालेल्या मोठ्या रकमांचे विश्लेषण आणि त्याच्या तपासासाठी प्राप्तिकर विभागाने २ कंपन्यांना नियुक्त केले आहे. ऑपरेशन क्लीनमनीतंर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत अशा खात्यासंदर्भात सुमारे ६ लाख उत्तरे आणि प्रतिक्रिया मिळाले आहेत.

सुमारे १८ लाख लोकांना एसएमएस आणि इ-मेल पाठवून या मोहिमेतंर्गत चौकशी करण्यात आली. ज्यांच्या बँक खात्यात नोटाबंदीच्या काळात पाच लाखांहून अधिक रक्कम जमा झाली. त्यांना हा संदेश पाठवण्यात आला. यातील ६ लाख लोकांनी बँक खात्यातील जमा रकमेबाबत उत्तरे दिली आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या मोहिमेतंर्गत ज्या करतदात्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना कोणत्याही प्रकारचा इशारा किंवा कारणे दाखवा नोटीस जारी करू नयते, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यात मिळालेल्या माहितीची सत्यता लवकर तपासल्यास पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ घेता येईल, असे सीबीडीटीचे म्हणणे आहे.

Leave a Comment