द. कोरिया- सुंदर पर्यटनस्थळांचा देश


उंच उंच पहाड, झुळझुळते, संगीताची निर्मिती करणारे निर्झर, दाट जंगले, विपुल वनसंपदा, काळेपांढरे पत्थर, दूरवर पसरलेले समुद्री तट, फुले पाने, अशी हरखून जाणारी निसर्गदृष्ये जगातील अनेक देशांत पाहायला मिळतात. निसर्गाचे हे स्वर्गसुख उपभोगण्यासाठी पर्यटक अशा देशांना भेटही देतात. मात्र ही सगळी वैशिष्ठे असलेल्या दक्षिण कोरिया पर्यटकांसाठी सहज फिरण्याची संधी सहजासहजी देत नाही. मात्र दक्षिण कोरियाला भेट देण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे हे नक्की.

आधुनिकतेबरोबर पारंपारिक वारसा जपलेला हा देश. समृद्ध पारंपारिक व आधुनिक कलेचा सुंदर मिलाप येथे घडून आला आहे. येथे पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत मात्र आज आपण माहिती घेतो आहोत ती या देशाची राजधानी सेओलची. सेओल द. कोरियाची नुसती राजधानीच नाही तर ते या देशाचे प्रमुख आर्थिक व राजकीय केंद्रही आहे. गजबजलेले शहर असूनही येथे शांतता मिळू शकते तसेच नाईट लाइफ जगण्याची संधीही येथे मनसोक्तपणे अनुभवता येते.


या शहरातील अनेक जागा जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्या आहेत. सेओलची खरी ओळख आहे ती स्ट्रीट फूड ही. रस्त्यांवर स्ट्रीट फूड पुरविणार्‍या गाड्यांच्या लांबचलांब रांगा येथे पाहायला मिळतात. झगमगत्या प्रकाशात त्यांची शोभा आणखीनच वाढते. या शहराला होम ऑफ स्ट्रीट फूड असे सार्थ नांवही दिले गेले आहे. सेओल हे मोठे व महत्त्वाचे शैक्षणिक केंद्रही आहे. तसेच बौद्ध मठांचे प्रमाणही येथे मोठे आहे.

येथील इमारतीत प्राचीन इमारती आहेत तशाच अत्याधुनिक इमारतीही आहेत. येथील फायनान्स बिल्डींग, एस सिओल टॉवर, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेव्हन स्कायस्क्रॅपर रेसिेडेंस टॉवर पॅलेस या त्यातील काही मुख्य इमारती. येथील बुसान किनार्‍यावरून दिसणारा सूर्योदयाचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा. नववर्षाच्या स्वागताला जगभरातून अनेक पर्यटक येथे गर्दी करतात. तसेच आयलंड ऑफ गॉडस नावाने ओळखले जाणारे जाजू बेट हे विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ज्वालामुखीचा हा प्रदेश त्यामुळे काळे पत्थर जागोजाग दिसतात तसेच कधीही पाऊस कोसळतो. हनीमून कपल्सचे हे आवडते पर्यटन स्थळ आहे.


पानगळच्या दिवसांत येथील जंगले लाल. पिवळ्या पानांची जणू रंगून जातात. येथील पर्वत, नद्याही पाहण्यासाठी आवर्जून यावे असे त्यांचे सौंदर्य आहे. येथे काही मंदिरेही आहेत. तसेच नॅशनल पार्क हे खास पर्यटन स्थळ आहे.

Leave a Comment