भारतात लॉन्च झाली होंडाची नवी कोरी अ‍ॅक्टिवा ४जी


नवी दिल्लीः आपल्या सर्वात जास्त विकल्या गेलेल्या ११० सीसी स्कूटर होंडा अ‍ॅक्टिवाचे चौथे व्हर्जन होंडा या लोकप्रिय बाईक कंपनीने लॉन्च केले आहे. नव्या अ‍ॅक्टिवा ४ जी ला बी एस-आयव्ही सोबत कंपनीने बाजारात आणले आहे. या नव्या गाडीची किंमत ५० हजार ७३० रूपये ऐवढी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिवाच्या चाहत्यांना आता नवी गाडी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ऑटो हेडलॅंम्प ऑन हे फिचर नवीन अ‍ॅक्टिवा ४जी मध्ये देण्यात आले आहे. याआधी होंडाने अ‍ॅक्टिवा १२५ ही गाडी आणली होती. आता या नव्या गाडीमध्ये दोन नव्या म्हणजेच मॅट सिलेन सिल्व्हर मटॅलिक आणि मॅट एक्सिस ग्रे मटॅलिक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

अ‍ॅक्टिवा ४जीमध्ये बीएस-आयव्ही असलेले ११० सीसीचे एचईटी, एअर कूल्ड, फोर स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८ बीएचची पावर ७५०० आरपीएमवर पॉवर आणि ९ एनएमच टार्क ५५०० आरपीएमवर जनरेट करते. या गाडीचे डिझाईन आधीच्या मॉडेल सारखेच वाटते. पण या नव्या गाडीचा फ्रन्ट लूक आधीच्या गाडीपेक्षा अधिक स्टाईलिश ठेवण्यात आला आहे. अ‍ॅक्टिवा ४जीमध्ये मोबाईल चार्जर, ट्यूबलेस टायर, सीटच्या खाली मोठी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. यासोबत होंडा अ‍ॅक्टिवा ४जीमध्ये इक्यूलायझर टेक्नॉलॉजीसोबत कॉम्बी ब्रेक सिस्टम सुद्धा देण्यात आले आहे.

Leave a Comment