जपानमध्ये सुरु आहेत आत्महत्येचे क्लासेस


आत्महत्त्यांचे वाढते प्रमाण ही जगासमोरील मोठी समस्या बनली असतानाच जपानमध्ये मात्र आत्महत्त्या करण्यापूर्वीच मृत्यूनंतरचा अनुभव देणारे क्लासेस घेतले जात आहेत. ये ग्रेव क्लासरूम असे या शिकवणी वर्गाचे नांव असून आत्महत्त्या करण्यास इच्छुक असलेल्या माहिलांना येथे मृत्यूनंतरचा अनुभव दिला जातो. मोकळ्या मैदानात हे क्लासेस घेतले जातात. ज्या महिलांना आत्महत्या करायची आहे, त्यांना येथे खड्यात दफन करून मृत्यूचा अनुभव दिला जातो. विशेष म्हणजे एकदा हा अनुभव घेतला की बर्‍याच जणी आत्महत्त्या करण्याचा विचार सोडून देतात.

तीस वर्षांची लियू तेजी या क्लासची चालक आहे. तीन वर्षापूर्वी तिच्या नवर्‍याने तिला सोडचिठ्ठी दिली तेव्हा तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. पण त्याचवेळी आपल्यासारख्या अनेक जणी या परिस्थितीतून जात असणार याची जाणीव तिला झाली व त्यातूनच तिला ग्रेव्ह क्लास रूम बनविण्याची कल्पना स्फुरली. त्यातून हे क्लास सुरू झाले. या क्लासला येणार्‍या महिलांना खड्यात मातीने पूर्ण झाकून टाकले जाते. तेथे मृत्यूचा अनुभव आल्यावर बरेचजणी आत्महत्त्येचा विचार सोडून जिद्दीने जीवनात यश मिळविण्यासाठी झटत आहेत असे लियू तेजीचे म्हणणे आहे.

Leave a Comment