मुंबई: राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून २०१५-१६ मधील ८ अधिसूचित पिकांकरिता ही भरपाई देण्यात येणार आहे. भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाई ८९३.८३ कोटी रुपयांची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधीत बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत मिळणार भरपाई
लातूर विभागात सर्वाधिक सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ४०२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे. बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. रब्बी हंगाम २०१५-१६ मध्ये अधिसूचित करण्यात आलेली 8 पिकांमध्ये हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सुर्यफुल, गहु (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमुग, उन्हाळी भात या पिकांचा समावेश आहे.
या योजनेत राज्यातील ३४.२६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ५६ कोटी ९१ लाख विमा हप्ता भरुन २४.६० लाख हेक्टर क्षेत्राकरिता २८६५.४० कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या २६.८८ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाई ८९३.८३ कोटी रुपयांची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधीत बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.