नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Aventador S ही स्पोर्ट्स कार लवकरच प्रसिद्ध स्पोर्टस् कार निर्माता कंपनी ‘लम्बोर्घिनी’ लाँच करणार आहे. या नव्या स्पोर्टस् कारमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.
लम्बोर्घिनी लवकरच लाँच करणार Aventador S
६.५ लिटरचे व्ही १२ इंजिन या स्पोर्टस् कारमध्ये देण्यात आले असून ० ते ३५० किलोमीटर/प्रतिलिटरमध्ये ही कार २.९ सेकंदाच्या कालावधीत इतके अंतर पार करु शकते. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लग्झरी कार उदया म्हणजेच ३ मार्चला भारतामध्ये लाँच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या कारमध्ये सेरामिक डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यंत वेगात असूनही ही कार सहजपणे नियंत्रित करता येऊ शकते.