भारतात दरवर्षी हजारांनी वाढणार करोडपतींची संख्या


दरवर्षी करोडपती कलबमध्ये समील होणार्‍या भारतीयांची संख्या येत्या दशकांत लक्षणीयरित्या वाढणार असून दरवर्षी किमान १ हजार भारतीय या यादीत येतील असा अहवाल नाईट फ्रँक वेल्थ संस्थेने दिला आहे. जगातील एकूण करोडपतींच्या २ टक्के करोडपती व अब्जाधीशांच्या संख्येत ५ टक्के भारतीय अब्जाधीश आहेत. येत्या कांही दशकात त्यात भारतातील नवश्रीमंत प्रचंड संख्येने असतील असे हा अहवाल सांगतो.

आजमितीला जगात १ कोटी ३६ लाख करोडपती आहेत व २०२४ अब्जाधीशांपैकी ५ टकके भारतात आहेत. २०१५-१६ मध्ये भारतात अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल संख्या १२ टक्के असून येत्या दशकात ती १५० टक्कयांवर जाईल असाही अंदाज वर्तविला गेला आहे. जागतिक संपत्तीचा परामर्श घेताना ८९ देशातील १२५ शहरांत सुपर श्रीमंतांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दशकात भारतात अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलच्या संख्येत २९० ट्कके वाढ झाली असून त्यात मुंबईत सर्वाधिक १३४० लोक अतिश्रीमंत यादीत आहेत. दिल्लीत अतिश्रीमंतांची संख्या ६८०, कोलकाता २८० व हैद्राबादेत २६० आहे. २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये पुणे, बेंगलोर, हैद्राबाद, मुंबईत ही संख्या वाढताना दिसते आहे. ज्यांची संपत्ती २०० कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना अल्ट्रा हाय नेटवर्थ यादीत सामाविष्ट केले जाते.

फ्यूचर वेल्थ मध्ये ४० जागतिक शहरांत मुंबई ११ व्या स्थानी असून मुंबईने या संदर्भात शिकागो, सिडने, पॅरिस, सोल व दुबईला मागे टाकले आहे.

Leave a Comment