पोरींचा डान्स व्हिडिओ पाहून अनेकांनी वाहीली शिव्यांची लाखोली


अभिनेता प्रभुदेवा आणि अभिनेत्री नगमाचा साधारण दोन दशकांपूर्वी ‘हम से है मुकाबला’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात ‘उर्वशी उर्वशी’ या गाण्यावर प्रभुदेवाने जबरदस्त डान्स केला हाता. पण आता हेच गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले असून या गाण्यावर बणविण्यात आलेला एक व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला आहे. जो पाहूण अनेकांनी नाके मुरडली आहेत. सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये तर, अनेकांनी शिव्यांची लाखोली वाहीली आहे. अनेकांनी या व्हिडिओला स्त्रीवादाशी जोडले आहे.

या गाण्यातील तीन मुलींनी ‘उर्वशी उर्वशी’ या गाण्याच्या शब्दांमध्ये बदल करत एक व्हिडिओ बनवला असून गाण्याचे म्युजिक आणि चाल तीच ठेवत त्यातील शब्द मात्र स्त्रीवादाशी जोडले आहेत. या मुली या गाण्यावर डान्सही करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ‘ब्रेकथ्रू इंडिया’ने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. ‘ब्रेकथ्रु इंडिया’ ही एक नॉन-प्रॉफिट संस्था असून, आपल्याकडील पितृसत्ताक व्यवस्था बदलावी यासाठी ही संस्था प्रयत्न करते.

दरम्यान, यापूर्वी युट्यूब आणि सोशल मीडियावर या संस्थेने आणखी एक व्हिडिओ अपलोड केला होता. जो लिंगसमानता आणि महिलांचे स्वातंत्र आनंदाने साजरे करा असा संदेश देत होता. मात्र, सोशल मीडियासारख्या मंचावर सर्व विचारांचे लोक असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक विचार तुम्हाला हवा तसा स्विकारला जाईल याची काहीच खात्री नसते. या व्हिडिओबाबतही असेच काहीसे झाले. सोशल मीडिया आणि युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी पातळी सोडून आपली मते तीव्र शब्दांत नोंदवली. अर्थात यात काही चांगल्या आणि व्हिडिओला पाठिंबा देणाऱ्या कमेंटही होत्या. पण, त्याचे प्रमाणही तितकेच होते.

दरम्यान तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमचे मत देऊ शकता.

Leave a Comment