भारतीय बनावटीची मर्सिडिझ बाजारात दाखल


मुंबई – भारतीय बनावटीची ई-क्लास श्रेणीतली गाडी जर्मन लक्झरी कार उत्पादक मर्सिडिझने बाजारात दाखल केली आहे. या गाडीची किमत एक्स-शो रूम ५६.१५ लाख रुपये असून बीएमडब्ल्यू, जॅग्वार, ऑडी आणि व्होल्वो या स्पर्धक गाड्यांना हे मॉडेल चांगलीच लढत देईल अशी अपेक्षा आहे.

मर्सिडिझ २०१७मध्ये संपूर्ण एलईडी लॅम्प, एअर सस्पेंन्शन, चारही सीट इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट करण्याची क्षमता, ३ स्पीकर असलेली साउंड सिस्टिम, पॅनोरॅमिक सनरूफ, स्टीअरिंग व्हीलवर स्पर्शानं चालणारे कंट्रोल्स देण्यात आले आहे. ही गाडी भारतीय ग्राहकांना पेट्रोल अथवा डिझेल अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिन २.० लिटर क्षमतेचे तर डिझेल इंजिन ३.० लिटर क्षमतेचे आहे. शून्यापासून १०० किलोमीटरचे वेग पेट्रोलची गाडी ८.५ सेंकदात तर डिझेलची गाडी ६.६ सेंकदात गाठत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मर्सिडिझसाठी भारतामधील प्रमुख स्पर्धक ऑडी ए-६, बीएमडब्ल्यू ५ सीरीज, व्होल्वो एस-९० आणि जॅग्वार एक्सएफ प्लस या गाड्या आहेत.

Leave a Comment