फॉक्स मोबाईलचे गामा व स्टाईल प्लस फोन लाँच


खात्रीशीर, टिकावू व वैशिष्ठपूर्ण फिचर फोन देणार्‍या फॉक्स मोबाईल कंपनीने स्मार्ट फिचर्सचे गामा व स्टाईल प्लस नावाचे दोन नवे फोन बाजारात आणले आहेत. सुंदर डिझाईन व चांगला बॅटरी बॅकअप, उत्तम दर्जा व मजबूती अशी त्यांची खासियत आहे. गॅमा १२९९ तर स्टाईल प्लस १४९९ रूपयांमध्ये मिळणार आहेत.

फॉक्स गामा साठी ड्युअल सिम,, ४.५ सेंमीचा डिस्प्ले, वायरलेस एफएम, रेकॉडिंग व २५०० एमएएएचची बॅटरी दिली गेली असून तो चार रंगात उपलब्ध आहे. स्टाईल वनसाठी ड्युअल सिम, ६.१ सेंमीचा डिस्प्ले, १८००एमएमएच बॅटरी अशा सुविधा असून तो तीन रंगात उपलब्ध आहे. या दोन्ही फोनसाठी ३२ जीबी मेमरी, हिंदी, पंजाबी, बंगाली भाषांचा वापर करण्याची सुविधा, ब्ल्यू टथ, टॉर्च, युनिव्हर्सल मायक्रो चार्जर, व्हाईस व ऑटो कॉल रेकॉडिंग सविधा, म्युझिक अशी फिचर्स आहेत. या दोन्ही फोनवर १ वर्षाची वॉरंटी आहे.

आयडीसीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भारतात २०१६ च्या चौथ्या तिमाहीत फोन विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून त्यात फिचर फोनची विक्रीही वाढली आहे. फॉक्स मोबाईलचे राष्ट्रीय प्रमुख दिलीप मुखेजा म्हणाले, ग्रामीण व अर्धनागरी भागात कमी किंमतीतील फिचर्स फोनना चांगली मागणी आहे. आमचे हँडसेट स्वस्त आहेतच पण ग्राहकाच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम आहेत.

Leave a Comment