दक्षिण बुटेन, पैसा वसूल नॅशनल पार्क


अंदमान निकोबार बेटे पूर्वीपासूनच निसर्गसंपन्न बेटे म्हणून जगाला माहिती आहेत. याच बेटांवरील साऊथ बुटेन राष्ट्रीय उद्यान निसर्गसौंदर्याचा मेरूमणी म्हणता येईल. जैवविविधतेने नटलेल्या या नॅशनल पार्कची माहिती फार पर्यटकांना नाही मात्र स्कूबा डायव्हिंग व स्नोरलिंग मध्ये रूची असलेल्या पर्यटकांमध्ये हे पार्क चांगलेच लोकप्रिय आहे. हे नॅशनल पार्क चारी बाजूंनी समुद्राचा किनार्‍यांनी वेढलेले आहे व चारी बाजूंनी ते हिरवेगार आहे. येथील वन्य प्राण्यांप्रमाणेच येथील निसर्गही पर्यटकांना भुरळ घालतो.


पाच चौरस मैल परिसरात हे पार्क असून बॅरन आयलंड, लॉग आयलंड व हॅवलॉक बेटे येथून अगदी जवळ आहेत. १९८७ मध्ये या नॅशनल पार्कची स्थापना केली गेली. विविध रंगी प्रवाळांचे प्रचंड खडक व एकदम मस्त व विस्तीर्ण उद्याने ही या पार्कची खासियत आहेत. येथे वर्षभर हवा चांगली असते पण मान्सून काळात हवा थोडी बदलते. जून ते आक्टोबर या काळात येथे पाऊस असतो. डिसेंबर ते एप्रिल हे महिने पर्यटनासाठी उत्तम मानले जातात.

निळेशार पाणी, त्यात तरंगणारे रंगबिरंगी मासे, अन्य समुद्री जीव जवळून न्याहाळ्याची संधी येथे मिळते. पाण्यातल्या पाली, समुद्री कासवे, डॉल्फीन, लॉयन फिश, एंजल फिश, बटरफ्लाय फिश, आक्टोपस अशा अनेक समुद्री जीवांनी येथील समुद्र समृद्ध केला आहे तसेच हत्ती, समुद्री गिधाडे अशा अनेक वन्य जीवांनी येथील निसर्गाला समृद्धी दिली आहे. प्रवाळांचे प्रचंड खडक पाहण्यासारखेच. येथे राहण्याची सोय नाही मात्र पार्क अॅथॉरिटीकडून विनंती केल्यास पर्यटकांना सुविधा दिल्या जातात. लॉग आयलंड, हॅवलॉग आयलंडवर निवासाच्या सुविधा आहेत. या ठिकाणीही राहता येते अन्यथ पोर्ट ब्लेयरला जाऊन मुक्काम टाकता येतो.

Leave a Comment