सोनीचा जगातील पहिला 4K HDR डिस्प्लेवाला स्मार्टफोन लाँच


मुंबई: मोबाईल उत्पादक कंपनी ‘सोनी’ने बार्सिलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला एक्सपीरिया डिव्हाईस लाँच केला आहे. कंपनीने एक्सपीरिया एक्सए१, सोनी एक्सपीरिया एक्सए१ अल्ट्रा आणि एक्सझेड प्रीमियम लाँच केले आहे. एक्सपीरिया एक्सझेड प्रीमियम एक्सझेडचे हाय एंड व्हेरिएंट आहे.

सोनीचा एक्सझेड प्रीमियम हा जगातील पहिला स्मार्टफोन असून ज्यामध्ये 4K HDR २१६०×३८४० रेझ्युलेशन असणार आहे. सोनीने 4K HDRसाठी अमेजनशी पार्टनरशीप केली आहे. HDR स्क्रिन कलर रिप्रोडक्शनसाठी खूप शानदार आहे. या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच स्क्रिन आहे. तसेच स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत अॅड्रिनो ५४० GPU असून ४ जीबी रॅम देण्यात आले आहेत. सोनी एक्सझेड प्रीमियममध्ये ६४ जीबी इंटरनल मेमरी असून २५६ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये १९ मेगापिक्सल रिअर आणि १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोनी एक्सझेड प्रीमियममध्ये ३२३० mAh बॅटरी क्षमता आहे.

Leave a Comment