विनाअनुदानित सिलिंडर महाग झाला


नवी दिल्ली – एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांकडून वाढ करण्यात आल्यामुळे विना अनुदानित सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विना अनुदानित सिलिंडरसाठी १ मार्च २०१७ पासून नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८६ रुपयांनी वाढ झाली आहे.

बिगर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये १ मार्च २०१७ पासून ८६ रुपयांची वाढ होणार असून हा निर्णय जागतिक स्तरावर एलजीपी संबंधित उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने घेण्यात आला आहे. मात्र या दरवाढीचा अनुदानित सिलिंडर वापरकर्त्यांना कोणताही फटका बसणार नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये जागतिक बाजारपेठेत वाढ झाल्यामुळे आता १४.३ किलोचा घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी ८६.५० रुपये अधिक मोजावे लागतील. तर १९ किलोचा व्यावसायिक कामांसाठी वापरायचा सिलिंडर विकत घेण्यासाठी १४९.५० रुपये अधिक मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. यासोबतच ५ किलोचा बिगर अनुदानित सिलिंडर ३०.५० रुपयांनी महागणार आहे.

खनिज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांकडून विना अनुदानित सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १४.२ किलोचा घरगुती वापरासाठीचा सिलिंडर ६९१ रुपयांऐवजी ७७७ रुपयांना मिळेल. तर १९ किलोचा व्यावसायिक वापराचा सिलिंडर १३३० रुपयांऐवजी १४७९.५० रुपयांना मिळेल. याशिवाय ५ किलोच्या सिलिंडरसाठी २५२ रुपयांऐवजी २८२ रुपये मोजावे लागतील. मात्र यासोबतच बँक खात्यात जमा होणारे अनुदानदेखील २५४.२० रुपयांवरुन वाढून ३४०.५७ इतके होणार आहे.

Leave a Comment