शेळ्यांच्या लेंड्या विकून येथे होतेय लाखोंची कमाई


प्रत्येक देशात विविध प्रकारचे व्यवसाय करून नागरिक पैसे कमावत असतात. मोरोक्को हा देशही त्याला अपवाद नाही. येथे शेळ्यांच्या लेंड्या विकून तेथील नागरिक लाखो रूपयांची कमाई करत आहेत. अर्थात ही लीद विशेष प्रकारची असल्याने त्याला चांगली किंमत येते असेही समजते.

साऊथ वेस्ट मोरकको व अल्जिरियात एक वेगळेच दृष्य दिसते. येथे झाडांवर चिमण्या कावळ्यांसारखे पक्षी दिसण्याऐवजी चक्क शेळ्यामेंढ्या चढलेल्या दिसतात. मालकही या शेळ्यांना झाडांवर खुशाल चढू देतात. कारण या शेळ्या या ऑर्गन नावाच्या झाडांवर चढून जी फळे खातात त्यातून बनलेल्या लेंड्यांना प्रचंड मागणी आहे. ही फळे स्वादिष्ट असतात ती शेळ्यामेंढ्याना आवडतातही. पण या फळातील बिया मात्र त्या पचवू शकत नाहीत व या बिया लेंड्यातून तशाच बाहेर टाकल्या जातात.

येथील व्यावसायिकांचे खरे काम त्यानंतर सुरू होते. मेंढपाळ अथवा गावकरी या लेंड्या एकत्र करून त्यातून या फळांच्या बिया बाहेर काढतात. या बियांमधील गर वाटून त्यातून तेल काढले जाते. हे तेल कॉस्मेटिक्स उद्योगात फार उपयुक्त असते व या १ लिटर तेलासाठी काॅस्मेटिक उत्पादक कंपन्या ७० हजार रूपये देतात. त्यामुळे या देशात शेळी पालन व त्यांच्या लेंडया विक्रीचा व्यवसाय वाढत चालला आहे.

Leave a Comment