भारतीय रेल्वे धावणार इंजिनांशिवाय


भारतीय रेल्वेतर्फे ट्रेन २०१८ नावाने एक योजना हाती घेतली गेली आहे. यानुसार अनेक कोच असलेल्या व प्रोपेलर सिस्टीमसह असलेल्या ट्रेन सेटची निर्मिती केली जाणार असून या ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावू शकतील व त्यांना स्वतंत्र लोकोमोटिव्ह इंजिनची गरज नसेल. या ट्रेन सेटचे डिझाईन बरेचसे मेट्रो प्रमाणे आहे. या ट्रेन सेट मार्च २०१८ पासून रूळांवर येतील असेही सांगितले जात आहे. इंजिनाशिवायची अशी पहिली ट्रेन दिल्ली चंदिगढ अथवा दिल्ली लखनौ या शहरांदरम्यान धावणार आहे.

या प्रायोगिक योजनेअंतर्गत चेन्नई मधल्या इंटिग्रल कोच कारखान्यात दोन ट्रेन सेटचे उत्पादन करण्यास सुरवात झाली आहे. त्यामागचा उद्देश प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात तसेच त्यांचा प्रवास वेगवान व्हावा असा आहे. सध्या १६ कोच असलेल्या ट्रेन सेट तयार करण्यात येत आहेत. या गाड्यातून जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा असतील. स्टेशन येताच उघडणारे व स्टेशनवरून सुटताना बंद होणारे ऑटोमॅटिक प्लग टाईप दरवाजे, बायो टॉयलेट, मोठ्या आकाराच्या खिडक्या, आरामदायी सीटस, असतीलच पण एसी कोच इंटरकनेक्ट असतील व त्यात वायफाय, इन्फोटेनमेंट, जीपीएस अशा सुविधाही मिळणार आहेत.

Leave a Comment