नासा पुढच्या वर्षात सूर्याच्या दिशेने घेणार झेप


पुढच्या वर्षात सूर्याच्या दिशेने नासाचे पहिले रोबोटिक यान सोडले जाणार आहे. या यानाचा उपयोग सूर्याभोवतीच्या हवामान तपासणीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचे नासाच्या सोलर प्रोब प्लस मिशनचे वैज्ञानिक एरिक क्रिस्टीयन यांनी सांगितले. यापूर्वी नासाने चंद्र, मंगळ व अन्य दूरच्या अंतरीक्ष ठिकाणी याने पाठविली आहेत. सूर्याच्या दिशेने यान पाठविण्याची मोहिम ही पहिलीच या प्रकारची मोहिम आहे.

एरिक म्हणाले, सूर्याचे तापमान प्रचंड असल्याने सूर्यापर्यंत कोणतेच यान जाऊ शकत नाही. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १४.९० कोटी किमी आहे. नासाचे यान ६० लाख किमीचा प्रवास करून जाईल. या यानामुळे तीन प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील अशी अपेक्षा आहे. पहिले म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५५०० डिग्री इतकेच असताना सूर्यावरील वातावणरचे तापमान २० लाख डिग्री पर्यंत कसे जाते हे समजू शकेल. तसेच सौर वादळालंना गती कशी मिळते याचाही अभ्यास यामुळे करता येईल.

Leave a Comment