१४५ रूपयांत एअरटेल देणार १४ जीबी ४जी आणि कॉल्स फ्री
‘जिओ’ला टक्कर देण्यासाठी एअरटेलच्या दोन धमाकेदार ऑफर
मुंबई – देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओमुळे स्वस्त इंटरनेट सुविधा देण्याची शर्यत सुरू असून सर्वच टेलिकॉम कंपन्या एकाहून एक सरस ऑफर आणत आहेत. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम एअरटेलनेही दोन धमाकेदार ऑफर आणल्या आहेत. कंपनीकडून १४५ रूपये आणि ३४९ रूपयांच्या रिचार्जवर एक महिन्यासाठी १४ जीबी ४ जी डेटा देत आहे. याशिवाय महिनाभरासाठी अमर्याद व्हॉईस कॉल देण्यात येणार आहे.
याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांच्या वृत्तानुसार, १४५ रूपयांच्या रिचार्जवर एअरटेल टू एअरटेल व्हॉईस कॉल फ्री असतील तर ३४९ रूपयांच्या रिचार्जवर कोणत्याही नेटवर्कवर कॉल फ्री असणार आहेत. यापुर्वी १६ जीबी डेटा आणि फ्री कॉलसाठी एअरटेल ग्राहकांना ११९९ रूपयांचे रिचार्ज करावे लागत होते. एक दिवसापुर्वीच एअरटेलने देशभरात रोमिंग फ्री केल्याची घोषणा केली आहे.