१ एप्रिलपासून एअरटेलचे रोमिंग शुल्क रद्द


मुंबई – देशातील दूरसंचार क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी असलेल्या एअरटेलने व्हॉईस आणि डेटा सेवेसाठीचे रोमिंग शुल्क रद्द केल्यामुळे आता एअटरेलच्या देशभरातील ग्राहकांना रोमिंग शुल्क लागू होणार नाही. एअरटेलकडून मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी रोमिंग शुल्क रद्द करण्यात आले आहे. एअरटेलच्या २६ कोटी ८० लाख ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

देशभरात कुठेही गेल्यास इनकमिंग कॉल, एसएमएस आणि आऊटगोईंग कॉलवर रोमिंग शुल्क आकारले जाणार नाही, असे एअरटेलने जाहीर केले आहे. देशातील रोमिंगचा अंत झाला आहे, अशा शब्दांमध्ये एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल वित्तल यांनी रोमिंग शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. रोमिंग शुल्क हटवल्याचा फायदा एअरटेलच्या ग्राहकांना १ एप्रिल २०१७ पासून मिळेल. १ एप्रिलपासून देशभरात कुठेही गेल्यास एअरटेलच्या ग्राहकांना रोमिंग शुल्क लागू होणार नाही.

Leave a Comment