मार्चपर्यंत भारतात दाखल होणार मोटो जी५, जी५ प्लस !


मुंबई: मोबाइल वर्ल्ड काँग्रेस २०१७मध्ये मोटोरोलाने मोटो जी५ आणि मोटो जी५ प्लस स्मार्टफोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.

मोटोरोलाची नेहमीप्रमाणे प्राथमिकता भारत असल्यामुळे मार्च महिन्यापर्यंत हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.

मोटो जी ५ आणि मोटो जी ५ प्लसमध्ये दोन्ही स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंटमध्ये सेन्सर असणार आहे. मोटो जी सीरीजच्या ५व्या व्हर्जनचे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड ७.० नोगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. मोटो जी५ मध्ये ५ इंच स्क्रीन असणार आहे. तर मोटो जी५ प्लसमध्ये ५.२ इंच स्क्रीन असणार आहे. दोन्ही मोबाइलमध्ये स्क्रिन फूल एचडी असून याचे रिझोल्यूशन १०८०×१९२० पिक्सल असणार आहे. मोटो जी५ मध्ये १.४Ghz Snapdragon 430 प्रोसेसर आहे तर मोटो जी५ प्लसमध्ये २ Ghz Snapdragon६२५ ऑक्टा-कोर प्रोसेसर असणार आहे. मोटो जी५ मध्ये २जीबी आणि ३ जीबी व्हेरिएंट आहेत तर मोटो जी ५ प्लसमध्ये २ जीबी, ३ जीबी आणि ४ जीबी व्हेरिएंट असणार आहेत. मोटो जी ५ मध्ये इंटरनल मेमरी १६ किंवा ३२ जीबी असणार आहे. तसेच एसडी कार्डद्वारे १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. मोटो जी ५ प्लसमध्ये इंटरनल मेमरी ३२ आणि ६४ जीबी असणार आहे. तर एसडी कार्डद्वारे १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.

Leave a Comment