जगातील पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च


नवी दिल्ली – चीनमधील इलेक्‍ट्रॉनिक्‍स् उत्पादने तयार करणार्‍या ZTE कंपनीने स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित MWC-2017मधे जगातील पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गिगाबाईट फोन 5-G नेटवर्कला सपोर्ट करते. कंपनीच्या मते, हा फोन जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्याची सुपर स्पीड 5G नेटवर्कला सपोर्ट करते. दरम्यान, 5G नेटवर्क 2020 पर्यंत येण्याची शक्‍यता आहे.

कंपनीने दावा केला आहे की, ZTE या गिगाबाइट स्मार्टफोनमध्ये 1GBPS डाऊनलोड स्पीड असेल. हा फोन 4जीच्या पहिल्या जनरेशनपेक्षा याची स्पीड दहापट असेल. या स्मार्टफोटमधून संपूर्ण मूव्ही फक्त एका सेकंदात डाऊनलोड करता येऊ शकते.

दरम्यान, जगभरातील अनेक कंपन्या 5जी नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे तंत्रज्ञान विकसीत झाल्यानंतर टीव्हीवरील कार्यक्रम थेट फोनद्वारे लाईव्ह बघता येऊ शकणार आहे.

Leave a Comment